आखिल भारतीय बंजारा सेना पक्षाची महिला चाळीसगाव तालुका कार्यकारिणीची निवड …
*बंजारा सेना पक्षात महिलांचे मजबूत संघटन उभे करणार
येत्या काही दिवसांत बंजारा सेनेचे तालुक्यात मजबूत संघटन उभे राहत असून बंजारा सेनेच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नावर संघर्ष व राजकीय संस्थेत सत्ता स्थापन करायला आखिल भारतीय बंजारा सेना पक्ष मैदानात दिसेल असे ता. अध्यक्ष योगेश्वर राठोड यांनी सांगितले…
आखिल भारतीय बंजारा सेना पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ.राधाताई मधुकर जाधव तर उपाध्यक्षपदी सौ.मनिषाताई मंगेश चव्हाण यांची नियुक्ती ता. अध्यक्ष योगेश्वर भाऊ राठोड यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली,
आपल्या हातून समाज हिताचे कार्य होवो, तालुक्यातील महिलांचे मजबूत संघटन निर्माण होवोत अशा सदिच्छा देऊण भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या..
आखिल भारतीय बंजारा सेना पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश्वर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दि.12/4/24 रोजी शासकीय विश्रामगृह येथे पक्षातर्फ मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध पदांच्या नियुक्ती देण्यात आल्या. पक्ष प्रवक्तेपदी मा.अशोक राठोड तालुका संघटक पदी मा.सुनील चव्हाण प्रसिद्धी प्रमुखपदी मा.सुनील जाधव यांची निवड करण्यात आली.यावेळी पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी चर्चा करण्यात येवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे ठरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक राठोड यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष योगेश्वर राठोड अशोक राठोड सुनील चव्हाण निंबा राठोड सुनील जाधव मधुकर जाधव इ.पदाधिकारी उपस्थित होते.