बंजारा समाज बांधवांचे धरणे आंदोलन यशस्वी
शिवप्रेमी दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण ,व बंजारा बांधवांचे बेमुदत धरणे आंदोलनाची ८ व्या दिवशी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याकडून दखल
कृ.उ.बा. समितीचे सभापती व संचालकांच्या उपस्थितीत लेखी पत्र देऊन मागण्या मान्य करण्यात आल्या…
आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते निंबू शरबत पाजून शिवप्रेमी दिलीप भाऊ पाटील यांचे आमरण उपोषण सोडविण्यात आले…
ठोस लेखी आश्वासनांचे पत्र घेऊण धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले..
संत सेवालाला महाराज चौक करणार आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून आंदोलकांना आश्वासन…
आणि नाईक साहेबांचा पुर्णाकृती पुतळा व प्रवेशद्वाराचे नामकरण हि मागणी जुनी असून ती देखील पुर्ण होईल असे असा शब्द देण्यात आला…
समाजातील जेष्ठ मंडळी व कृ.ऊ.बा.समितीचे सभापती, संचालकांनी जवळपास तास दिड तास आंदोलकांशी सविस्तर सकारात्मक चर्चा केली, येत्या आठवड्याभरात सभागृहात निर्णय घेऊन ठराव करतो असे उपस्थित सर्व संचालकांकडून सांगण्यात आले…
या प्रसंगी चर्चा करतांना समाजाचे जेष्ठ नेते रामदास रायसिंग जाधव, प्राणी मित्र इंदल चव्हाण ,मार्केटचे सभापती मा. मच्छिंद्र भाऊ राठोड, संचालक रविंद्र भाऊ पाटील माजी जि.प. सदस्य राजेंद्र भाऊ राठोड, मा.पं.स.सभापती विजय भाऊ जाधव, मार्केटचे माजी सभापती कपिल भाऊ पाटील माजी उप सभापती साहेबराव भाऊ राठोड, मार्केट संचालक शैलेंद्र राजपूत, निलेश वाणी,बंजारा एकीकरण समितीचे सचिव चिंतामण चव्हाण, भारतीय समाज सेवा संघाचे रा. संघटक डी.सी. चव्हाण, सुदाम चव्हाण अदी उपस्थित होते…
सलग ८ दिवस रात्र धरणे आंदोलन करणारे बंजारा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर भाऊ राठोड, अॅड. भरत चव्हाण भिमराव जाधव ,रूपसिंग जाधव, अशोक राठोड ,वंचितांचा प्रतिनिधी न्यूज रिपोर्टर सुनिल चव्हाण, सुभाष राठोड , आंदोलन मिडीया प्रमुख कैलास चव्हाण, सुनिल जाधव , अविनाश चव्हाण, गोकुळ राठोड, अदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वितेसाठी परिश्रम घेतले..
शेतकरी बचाव कृती समितीचे जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. काशिनाथ जाधव माऊली, कांतिलाल राठोड, चत्रू राठोड, तळेगाव चे अनिल राठोड ,अनिल पेंटर करगाव , नरेंद्र राठोड , धर्मराज राठोड, जयलाल चव्हाण,जेष्ठ मंडळीं तरूण बांधवांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व सलग ८ दिवस आंदोलनात सहभाग नोंदविला…
आंदोलनाच्या समर्थनार्थ खालील विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठींबा देऊन आंदोलनात सहभाग सहभाग घेतला
लहुजी शक्ती सेना, त्रिदल माजी सैनिक सेना, पै.तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य, मांस मोंमेंट संघटना, वसंतराव जी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती चाळीसगाव, मराठा महासंघ, राष्ट्रीय जनमंच पक्ष, बहुजन क्रांती मोर्चा, संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती चाळीसगाव, राष्ट्रीय संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, रयत सेना, संभाजी सेना, महाराष्ट्र परिवहण कामगार सेना, भारतीय समाज सेवा संघ, विर एकलव्य संघटना, धनगर समाज सेवा संघटना, बंजारा एकीकरण महासमिती , राष्ट्रीय बंजारा टायगर, अखिल भारतीय बंजारा सेना पक्ष ,अदी सामजिक संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जाहीर पाठींब्यांचे पत्र देऊन आंदोलकांची ताकद वाढविली…
भिमराव जाधव ( सामाजिक कार्यकर्ता)